भारतीय शेअर बाजारात उच्चांक, अर्थव्यवस्था मात्र मंदीत, हे कसं काय? #सोपी गोष्ट 258

Published

21 जानेवारीला बाँबे स्टॉक एक्सचेंजच्या संवेदनशील निर्देशांकाने 50 हजारचा ऐतिहासिक उच्चांक गाठला.

2020 मध्ये कोव्हिडच्या विळख्यात जग सापडलं तेव्हा याच शेअर बाजारात निर्देशांकाचा स्तर एप्रिल महिन्यात अगदी 25,600 खाली गेला होता आणि पुढच्या दहाच महिन्यात पुन्हा सेन्सेक्सने 100 टक्क्यांनी उसळी मारली.

पण, गेल्या दोन तिमाहींमध्ये देशाची अर्थव्यवस्था निगेटिव्ह ग्रोथमध्ये जाऊनही नवीन वर्षी शेअर बाजार कसा काय चढतोय? शेअर बाजारातली ही वाढ खरंच टिकणारी आहे का? आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे अशा वेळी गुंतवणूकदारांनी नेमकं काय करायचं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये...

संशोधन – ऋजुता लुकतुके

लेखन, निवेदन – ऋजुता लुकतुके

एडिटिंग – निलेश भोसले

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)