जो बायडन : जागतिक तापमान वाढ रोखण्यासाठी पॅरिस करार का महत्त्वाचा आहे? #सोपी गोष्ट 257
अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी शपथ घेतल्यावर पहिल्याच दिवशी नवीन निर्णयांचा धडाका लावला. पॅरिस पर्यावरण करारात पुन्हा सामील होणं हा त्यातलाच एक निर्णय.
हा करार म्हणजे जागतिक तापमान वाढ रोखण्यासाठी 200 देशांनी एकत्र येऊन कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी केलेली प्रतिज्ञा आहे.
तापमान वाढ कमी करण्यासाठी पावलं उचलणं ही अमेरिकेची प्राथमिकता आहे, असंच बायडेन यांनी आपल्या कृतीने सूचवलं आहे.
पण, त्यानिमित्ताने आज सोपी गोष्टमध्ये पाहूया पर्यावरणासाठी पॅरिस करार का महत्त्वाचा आहे आणि अमेरिकेबरोबरच भारताचाही या पर्यावरण मोहिमेतला सहभाग.
संशोधन – ऋजुता लुकतुके
लेखन, निवेदन – ऋजुता लुकतुके
एडिटिंग – निलेश भोसले
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)