...तर 96 वर्षांचे पियानोवादक जेगल सॅम दक्षिण कोरियाच्या युद्धभूमीवर असते

व्हीडिओ कॅप्शन, ...तर 96 वर्षांचे पियानोवादक जेगल सॅम दक्षिण कोरियाच्या युद्धभूमीवर असते.
Published

दक्षिण कोरियाचे पियानिस्ट जेगल सॅम गेली 82 वर्षं पियानो वाजवतायत आणि अजूनही त्यांच्या बोटांची जादू कायम आहे.

वयाच्या 14 वर्षी त्यांनी पियानो शिकायला सुरुवात केली, त्यानंतर त्यांना पियानोने कायमच साथ दिली. जवळपास अर्ध शतक म्हणजे पन्नास वर्षं त्यांनी शिक्षक या नात्याने अनेक विद्यार्थी घडवलेयत.

तर एका विद्यार्थ्यामुळेच ते कोरियाच्या युद्धभूमीवर जाता जाता राहिले. आता रिटायर्ड होऊन अनेक वर्षं झाली तरी ते रोज पियानोचा सराव करतात. का तर एखाद्या कार्यक्रमात संधी मिळाली तर ती हुकायला नको म्हणून.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)