मटण : हलाल आणि झटका यांच्यात नेमका काय वाद आहे?
भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाने (एपीडा) 'लाल मांस' संदर्भातील नियमांमधून 'हलाल' हा शब्द काढून टाकला आहे.
त्याऐवजी आता नियमानुसार 'जनावरांना आयात करणाऱ्या देशांच्या नियमांनुसार कापण्यात आले आहे' असे म्हटले आहे.
सोमवारी हा बदल करण्यात आला. आतापर्यंत मांसाला निर्यात करण्यासाठी त्याचे 'हलाल' होणे ही महत्त्वाची अट मानली जात होती.
'हलाल'चे प्रमाणपत्र देण्यात कोणत्याही सरकारी विभागाची कोणतीही भूमिका नसल्याचे एपीडाने स्पष्ट केले आहे.
आधीच्या नियमांनुसार, "सर्व प्राण्यांची कत्तल इस्लामी शरियतनुसार केली जाते आणि जमियत-उल-उलेमा-ए-हिंदच्या देखरेखीअंतर्गत जमियत प्रमाणपत्र देते."
पण, हलाल आणि झटका हा वाद नेमका काय आहे?
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)