कोरोना व्हायरसच्या साथीमुळे जागतिक तापमान वाढीचा धोका कमी झाला का?

Published

साधारण एका वर्षापूर्वी जगभरात कडक लॉकडाऊन लावले गेले तेव्हा काही काळासाठी कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण कमी झालं.

अगदी प्रदूषित शहरांमध्येही हवा स्वच्छ दिसू लागली. उत्सर्जन कमी होण्याचं हे प्रमाण खरंतर विक्रमी होतं. पण, म्हणून तापमान वाढीचा धोका कमी झाला का? याचं थेट उत्तर आहे – नाही.

कारण, कार्बन वायू वातावरणात शंभर वर्षं राहू शकतो. आणि असा कितीतरी लीटर वायू आधीपासूनच वातावरणात साठून राहिलेला आहे. तापमान वाढ कमी करण्यासाठी गरज आहे ती सातत्याने आणि कित्येक वर्षं कार्बन उत्सर्जन कमी करण्याची.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)