पूजा देवी : 3 मुलांची आई ते जम्मू काश्मीरमधील पहिली महिला बस ड्रायव्हर

Published

पूजा देवी जम्मू आणि काश्मीरच्या पहिल्या महिला बस ड्रायव्हर बनल्या आहेत. त्या जम्मूमधल्या कठूआ जिल्ह्यात राहतात.

तीन मुलांची आई पूजा देवी यांनी नुकतंच कठूआ ते जम्मू रस्त्यावर प्रवाशी बस चालवली. जम्मूच्या बस स्टँडवर त्यांनी प्रवाशांना सोडलं, तेव्हा ड्रायव्हिंग सीटवर बसलेल्या महिलेला पाहायला अनेकांनी गर्दी केली.

त्यांनंतर त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. जुन्या विचारांना छेद देणाऱ्या पुजा यांचं सोशल मीडियात खूप कौतूक होत आहे. त्यांच्याविषयी आणखी जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)