करिमा बलोच: नरेंद्र मोदींना भाऊ म्हणणाऱ्या बलोच कार्यकर्तीचा मृत्यू #सोपीगोष्ट 237
पाकिस्तान सरकारने दहशतवादाचे आरोप ठेवलेल्या बलोच कार्यकर्त्या करिमा बलोच यांचा मृत्यू झाला. पाकिस्तानातून पळ काढून त्या 2015 पासून टोरॅंटोमध्ये राहत होत्या.
बलोच लोकांच्या हक्कांसाठी त्या कार्य करत होत्या. 2016 साली पंतप्रधान मोदींनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात बलोचिस्तानचा उल्लेख केल्यानंतर करिमा यांनी मोदींना एका व्हीडिओ संदेशाद्वारे मदतीचं आवाहन करताना त्यांचा भाऊ म्हणून उल्लेख केला होता.
बलोच चळवळीतले काही घटक स्वतंत्र राष्ट्राची मागणी करतात तर काही पाकिस्तान सरकारचा कडवा विरोध करतात. पाकिस्तान सरकारने भारतावर बलुचिस्तानात हिंसाचार भडकवल्याचे आरोप अनेकदा केलेत. भारताने हे आरोप फेटाळलेत.
संशोधन, लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू
एडिटिंग- निलेश भोसले
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)