कोरोना व्हायरसचा उगम खरंच वुहानच्या त्या प्रयोगशाळेतून झाला का?

Published

चीनमधल्या ज्या प्रयोगशाळेतून कोरोना व्हायरस लीक झाल्याचा आरोप होतो, तिथून बीबीसीचे प्रतिनिधी जॉन सडवर्थ यांचा हा खास रिपोर्ट आहे.

तिथल्या एका वरिष्ठ संशोधक महिलेनं बीबीसीला सांगितलं की, कुठल्याही प्रकारच्या खुल्या चौकशीसाठी त्या तयार आहेत. पुढच्या महिन्यात जागतिक आरोग्य संघटनेचं एक पथकही वुहानच्या त्या प्रयोगशाळेचा दौरा करणार आहे.

व्हायरसचा उगम खरंच त्या प्रयोगशाळेतून झाला का याचा तपास हे पथक करणार आहे. त्या पार्श्वभूमीवर बीबीसीनेही व्हायरसच्या उगमाच्या सगळ्या शक्यता पडताळून पाहण्याचं ठरवलं. त्याविषयीचा हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट...

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)