औरंगाबाद : 10 हजार दुर्मिळ नाण्यांचा संग्रह करणारे पराग कचेश्वर - पाहा व्हीडिओ
Published
औरंगाबाद येथील पराग कचेश्वर यांच्याकडे दहा हजारांपेक्षा जास्त प्राचीन नाण्यांचा संग्रह आहे.
त्यासोबतच त्यांनी विविध देशांतील नोटा, स्टॅंप, आणि पुरातन वस्तूंही जमा केल्या आहेत. त्यांना ही दुर्मिळ नाणी जमवण्यासाठी बराच प्रवासही करावा लागल्याचं ते सांगतात.
आपल्याला मिळालेले नाणे खरे की खोटे याची पारखही त्यांनी तज्ज्ञांकडून करून घेतली आहे. या पुरातन वस्तू त्यांच्या पुढील पिढीला पाहाता याव्यात यासाठी आपण याचं संग्रहालय उभारावं अशी पराग यांचा मानस आहे.
रिपोर्टर - राहुल रणसुभे, बीबीसी मराठी
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)