'महिला मेकॅनिक असल्याचा मला अभिमान आहे' - पाहा व्हीडिओ
Published
हिंगोली जिल्ह्यातल्या आखाडा बाळापूर या गावात राहाणाऱ्या जयश्री आंभोरे पंचक्रोशीतल्या एकमेव महिला मेकॅनिक आहेत. त्या शेतीपंप, मोटारी, घरगुती उपकरणं या सगळ्यांची दुरूस्ती करण्यात तरबेज आहेत.
मोटार दुरुस्तीचं काम फक्त पुरुषांचं आहे असं जयश्रीताईंना वाटत नाही. उलट आपण हे काम केल्याने पतीला मदत होते आणि आपल्या हातात स्वकमाईचे पैसे येतात, घरात पैसे मागावे लागत नाहीत याचा त्यांना आनंद आहे.
रिपोर्ट – अनघा पाठक
शूट – शाहिद शेख
एडिटिंग - राहुल रणसुभे
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)