कोरोना लस: श्रीमंत देशांमध्ये पोहोचली कोरोना लस पण गरीब देश अजूनही वंचित

Published

युके आणि अमेरिकेत कोरोना लसीकरणाला सुरुवातही झाली आहे. इतर देश मात्र अजूनही लशीच्या प्रतिक्षेत आहेत. काही आरोग्य तज्ज्ञांचा तर असा दावा आहे की, श्रीमंत देशांनी औषध कंपन्यांशी लागेबांधे करून लशीचा जास्तीत जास्त साठा आपल्याच देशात कसा येईल यासाठी प्रयत्न चालवले आहेत.

अशा वेळी बीबीसीने पाकिस्तान, मेक्सिको यासारख्या देशातल्या लोकांशी संपर्क साधला. आणि जाणून घेण्याचा प्रयत्न केला की, हे देश लस मिळवण्यासाठी कसा प्रयत्न करत आहेत. गरीब देशांपर्यंत लस कशी पोहोचेल याचा जागतिक स्तरावर काही कार्यक्रम तयार आह का याचा घेतलेला हा आढावा...

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)