You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शेतकरी आंदोलन: ‘आधी बेरोजगारी, वर हे कृषी कायदे. सरकारवरील विश्वासच गेला’
मागचे दोन आठवडे हजारो शेतकरी दिल्ली-हरयाणा सीमेवर आपले ट्रक आणि ट्रॅक्टर अडवून आंदोलनाला बसले आहेत. त्यांचं आंदोलन आहे कृषि कायद्यांच्या विरोधात. या आंदोलनात वयोवृद्ध शेतकऱ्यांच्या बरोबरीने तरुण शेतकरीही सहभागी झाले आहेत.
यातले काही शेतकरी नाईलाजास्तव शेती करतायत तर काही स्वखुशीने शेतीत उतरले. पण, सध्या त्यांची नाराजी आहे ती शेतीतून कमाई होत नसल्यामुळे अशाच दोन तरुण शेतकऱ्यांशी बीबीसी प्रतिनिधी दिव्या आर्य यांनी संवाद साधला आणि त्यांची व्यथा जाणून घेतली.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)