मुंबई मनपासाठी राज ठाकरेंशी युती करण्यास फडणवीस का नाहीत तयार?
Published
शिवसेनेने साथ सोडल्यानंतर भाजप आता मनसेची साथ घेणार का? याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. परंतु भाजपने आता स्वबळावर निवडणुका लढवण्याचं पक्कं केलं आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आता याबाबत भाजपची भूमिका स्पष्ट केली आहे.
शिवसेनेनं भाजपची साथ सोडणं आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर नरमाईची भूमिका घेणं, इथेच मनसे स्वत:साठी नवी राजकीय संधी शोधते आहे. ती संधी साधण्यासाठीच आता मनसे हिंदुत्वाकडे झुकेल आणि भाजपचा राज्यातला नवा पार्टनर होईल, अशी शक्यता वर्तवली जाते आहे.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)