महापरिनिर्वाण दिनी बाबासाहेबांना पत्रांद्वारे अभिवादन

व्हीडिओ कॅप्शन, महापरिनिर्वाण दिनी बाबासाहेबांना पत्राद्वारे अभिवादन
Published

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी येथे देशाच्या कानाकोपऱ्यातून अनुयायांनी पत्रं पाठवली आहेत. यावर्षी कोरोना आरोग्य संकटाचे सावट असल्याने अनुयायांना चैत्यभूमीवर गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

त्याऐवजी 'अभिवादन महामानवाला' या उपक्रमाअंतर्गत आपल्या भावना पत्राद्वारे पाठवण्याचा उपक्रम आयोजकांनी राबवला. या उपक्रमाअंतर्गत अनुयायांची पत्र चैत्यभूमी स्मारक कार्यालयात पोहचली आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)