गावं-पाड्यांची नावं बदलल्यामुळे समाजातून जातीयता हद्दपार होईल का? # सोपी गोष्ट 222

व्हीडिओ कॅप्शन, गावांच्या नावातून जातीवाचक शब्द काढून टाकल्याने जातीवाद मिटेल का?
Published

जात नाही ती जात असं म्हणतात. पण, आता राज्यसरकारने निदान शहरं, गावं, पाडे आणि वस्त्यांच्या नावामधून जात किंवा जातीवाचक शब्द काढून टाकण्याचा निर्णय घेतलाय.

म्हणजे इथून पुढे भटवाडी, भोईवाडा, कुंभार गल्ली अशा वस्त्या असणार नाहीत. अशी नावं राष्ट्रपुरुष, समाजसेवक अशा लोकांच्या नावाने बदलण्यात येतील असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतलाय.

पण, नावांमध्ये असा बदल करून समाजात बदल घडून येणार आहे का? जातीभेद निर्मूलन शक्य होणार आहे का? आणि जातीवरून राजकारणाची जी किड राजकीय पक्षांना लागलीय ती मरणार आहे का? याचाच परामर्श घेऊया आजची सोपी गोष्टमध्ये....

लेखन, निवेदन – ऋजुता लुकतुके

एडिटिंग – शरद बढे

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)