ऑक्सफर्डची लस विक्रमी दहा महिन्यात कशी तयार झाली? #सोपी गोष्ट 218

Published

कोरोनाच्या या काळात जर पुन्हा पहिल्यासारखं जगायचं असेल तर त्यासाठी आपल्याला हवीये कोरोनावरची लस. डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत अमेरिकेत मॉडर्ना आणि फायझरच्या लशी लोकांपर्यंत पोहोचू शकतील असा अंदाज वर्तवण्यात येतोय.

तर साधारण त्याचवेळी युकेच्या ऑक्सफर्ड विद्यापीठात तयार झालेल्या आणि भारतात सिरम इन्स्टिट्यूटमध्ये उत्पादन सुरू असलेल्या लशीच्या सर्व चाचण्याही पूर्ण होण्याची शक्यता आहे.

पुण्यात तयार होणाऱ्या या ऑक्सफर्डच्या लशीचं उत्पादन नेमकं कसं सुरू आहे आणि लस लोकांपर्यंत आणण्यासाठीचे पुढचे टप्पे काय याचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज शनिवारी पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्यूटला भेट दिली आणि कामाची पाहणी केली.

संशोधन – बीबीसी आरोग्य टीम

लेखन, निवेदन – ऋजुता लुकतुके

एडिटिंग – निलेश भोसले

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)