पाकिस्तानात कोव्हिडचे रुग्ण कमी होत असताना अचानक दुसरी लाट येण्याचे संकेत कसे मिळाले?

व्हीडिओ कॅप्शन, पाकिस्तानमध्ये कोरोनाची दुसरी लाट, शहरांमध्ये 200 टक्क्यांनी रुग्ण वाढले.
Published

कोरोनाची पहिली लाट थोपवून कोरोनाग्रस्तांचे आकडे कमी करण्यात पाकिस्तानने आपल्या शेजारी देशांपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. पण आता पाकिस्तानने देशात कोरोनाची दुसरी लाट असल्याचं मान्य केलंय.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ट्वीटरवर कोव्हिड-10च्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचं म्हटलंय. गेले काही आठवडे व्हेंटिलेटरवरील रुग्णांची संख्या वाढतेय आणि मुल्तान, पेशावर सारख्या शहरांमध्ये रुग्णांचे आकडे 200 टक्क्यांनी वाढले आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली आहे. बीबीसीच्या प्रतिनिधी शुमेएला जाफरी यांचा हा रिपोर्ट.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)