You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
वडिलांच्या अपघातामुळे टॅक्सी चालवायची जबाबदारी आली आणि...
महिला टॅक्सी चालक मुंबई पुण्याला नवीन नाहीत. पण उच्चशिक्षण घेऊन गगनभरारी घेण्याची स्वप्नं पाहणाऱ्या गडचिरोलीच्या किरणवर वडिलांच्या अपघातामुळे त्यांची टॅक्सी चालवायचं काम हाती घ्यावं लागलं.
नक्षलग्रस्त आणि अभावग्रस्त भागातील पहिली महिला टॅक्सीचालक म्हणून तिची नोंद आता इंडिया बुक ऑफ रेकार्ड्सनं घेतली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा पासून 70 किलोमीटर अंतरावरील रेगुंठा या गावची किरण कुर्मावार.
पक्क्या रस्त्यांचा अभाव, डोंगराळ भाग आणि नक्षवाद्यांची दहशत हे रेगुंठा परिसराचं वैशिष्ट्य. परिसरात एसटी बसचं दर्शनही एखाद्यावेळीच होतं. आदिवासीबहुल रेगुंठा परिसरात उच्चशिक्षणाची सोय नाही. या सर्व संकटावर मात करत किरणने उच्चशिक्षण घेतलं आणि आता याच नक्षलग्रस्त भागात टॅक्सी चालवते आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)