कोरोना कोल्हापूर: मुस्लीम तरुण जात-धर्म विसरून मृतांवर अंत्यसंस्कार करू लागले...
Published
बैतुलमाल कमिटीतील सर्व सदस्य हे मुस्लीम आहेत. मात्र त्यांनी जात-धर्म बाजूला ठेवत या संकटकाळात 200हून अधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत.
कोरोनामुळे मरण पावलेल्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी अनेकदा कुणीच धजावत नव्हतं.
अशात कोल्हापुरात बैतुलमाल कमिटीच्या सदस्यांनी पुढाकार घेतला आणि जिल्ह्यातील अनेक मृतांवर कधी दफन केलं तर कधी अग्नीसुद्धा दिला.
व्हीडिओ रिपोर्ट – स्वाती पाटील
एडिटिंग – राहुल रणसुभे
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)