You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमृता फडणवीस यांच्या गाण्यावर नेटिजन्सच्या काय प्रतिक्रिया आल्या?
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस पुन्हा एकदा नेटिझन्सच्या टीकेच्या धनी ठरल्या आहेत.
मुलींना ‘जगू द्या…शिकू द्या…” अशा आशयाचं मिसेस फडणवीस यांनी गायलेलं गाणं टी-सिरीजने नुकतच सोशल मीडियावर प्रदर्शित केलं. मात्र, या गाण्यामुळे अमृता फडणवीस सोशल मीडियावर खूप ट्रोल होत आहेत.
अमृता फडणवीस यांना नेटिझन्यकडून ट्रोल करण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी राजकारणाबद्दलची वक्तव्य, बोटीवरून प्रवासात सुरक्षेचा विचार न करता काठावर बसल्याचा फोटो व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सकडून अमृता फडणवीस यांना ट्रोल करण्यात आलं होतं.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)