You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोनाच्या काळात ही 13 वर्षांची मुलगी अशी बनली शिक्षिका
केरळच्या पालक्काड जिल्ह्यातील अट्टप्पडी गावातली एक मुलगी आणि तिचा अभ्यासाचा वर्ग कौतुकाचा विषय ठरलाय.
कोरोना संकट काळात लॉकडाऊनमुळे शाळा बंद असल्याने मुलांना शिक्षण मिळण्यात अडचणी येऊ लागल्या. डीजिटल शिक्षण सर्व आर्थिक स्तरातील विद्यार्थ्यांना परवडणारं नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागतंय.
2020 मध्ये जगभरातील जवळपास 24 कोटी विद्यार्थ्यांची शाळागळती होईल अशी भीती व्यक्त केली जातेय. या पार्श्वभूमीवर केरळमधल्या एका आदिवासी गावातली लहान मुलगी आशेचा किरण दाखवतेय.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)