बीडमध्ये अ‍ॅसिड आणि पेट्रोल टाकून प्रियकराने प्रेयसीला जिवंत जाळलं.

व्हीडिओ कॅप्शन, बीडमध्ये अ‍ॅसिड आणि पेट्रोल टाकून नांदेडच्या तरुणीला जिवंत जाळलं.
Published

नांदेड जिल्ह्यातल्या देगलुर तालुक्यातील शेळगावमधील तरुणीला जिवंत जाळण्याची घटना बीड मार्गावर घडली. ही तरुणी प्रियकरासोबत पुण्याहून नांदेडमधील आपल्या गावी दुचाकीवरुन जात होती.

पहाटे तीनच्या सुमारास आरोपी अविनाश राजुरे याने तिच्यावर अ‍ॅसिड आणि पेट्रोल टाकून तिला जाळलं. दुसऱ्या दिवशी रस्त्याच्या शेजारी पडलेल्या या तरुणीला रुग्णालयात नेण्यात आलं. त्यावेळी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री आठ वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)