महाराष्ट्र अनलॉक : मंदिरं, मशिदी उघडल्यानंतर अशी झाली भाविकांची गर्दी – पाहा व्हीडिओ

Published

अखेर 16 नोव्हेंबरपासून राज्यातील देवस्थानं दर्शनासाठी खुली करण्यात आली आहेत.

कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे तब्बल आठ महिने राज्यातील मंदिरं, मशिदी, चर्चसह इतर धार्मिक स्थळं बंद होती.

त्यामुळे आज राज्यभरात पहिल्याच दिवशी भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. मंदिरांसोबतच मशिदी आणि दर्गेसुद्धा खुले करण्यात आलेत.

भाजपने राज्यातील मंदिरं खुली करण्यासाठी अनेक आंदोलनं केली होती. त्यामुळे यानिमित्ताने त्यांनी राज्यभरात आनंदोत्सव साजरा केला.

व्हीडिओ – गुलशनकुमार वनकर आणि अरविंद पारेकर

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)