'तैवान पेरू'ची शेती करून या शेतकऱ्याने कमावले हजारो रुपये

Published

ही गुजरातच्या प्रेमजी भाई यांच्या पेरूच्या शेतीची गोष्टी असली तर महाराष्ट्रातही याची शेती होत आहे. प्रेमजी भाई हे सुरेंद्रनगर जिल्ह्यातील चुडा गावचे शेतकरी आहेत. त्यांनी तैवानमधून या पेरूची तब्बल 9 हजार रोपं आणली आहेत.

विशेष म्हणजे हे रोप लावलं की 6 महिन्यांतच फळं यायला सुरुवात होते. एका पेरूचं वजन साधारण 300-400 आहे. महाराष्ट्रातही अशा पेरूंची लागवड होत आहे. यातून त्यांना हजारो रुपयांचा नफा झालाय. त्यांच्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)