कोरोना काळातली दिवाळी: नाशिकच्या रेड लाईट भागात सेक्स वर्कर्स बनवत आहेत दागिने
Published
एरवी दुपार टळून गेली की रेडलाईट एरियाला जाग येते. पण नाशकातल्या मध्यवस्तीतल्या या रेडलाईट भागातल्या एका घरात वेगळीच लगबग सुरू आहे. इथल्या सेक्सवर्कर्स इमिटेशन ज्वेलरी बनवत आहेत.
कोरोना काळात सोशल डिस्टन्सिगमुळे सध्या सेक्सवर्कर्सचा व्यवसाय पूर्वीसारखा होत नाहीये. या महिलांनाही आपल्या जीवाची भीती आहे,त्यामुळे आता या ज्वेलरीच्या व्यवसायातून कमाई व्हावी अशी त्यांची अपेक्षा आहे.
मराठी सीरियलमधले महिलावर्गात लोकप्रिय असणारे ज्वेलरी डिझाईन बनवून विकण्याची या सेक्सवर्कर्सची इच्छा आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)