You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मिलिंद सोमण आणि पूनम पांडे यांच्या नग्न फोटोंवरचा वाद काय? #सोपीगोष्ट 203
याच आठवड्यातले दोन फोटोशूट्स. प्रथितयश मॉडेल आणि अभिनेते मिलिंद सोमण यांनी आपला 55वा वाढदिवस साजरा करताना समुद्रकिनाऱ्यावर नग्न धावतानाचा एक फोटो टाकला.
नेटिझन्सनी फिटनेसवरून त्यांच कौतुक केलं. त्याचवेळी पूनम पांडे या अभिनेत्रीला गोव्यातील एका फोटोशूटसाठी तुरुंगाची हवा खायला लागली आहे. हे फोटोशूट अश्लील आहे आणि त्यातून लोकांच्या कामूक भावना चाळवू शकतात असं म्हणून तिच्यावर ही कारवाई झाली.
लागोपाठ घडलेल्या या घटनांनी नग्नता आणि अश्लीलता यावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. नग्नता प्रत्येक वेळी अश्लीलताच असते का? दोन्हीत नेमका फरक काय आहे आणि महत्त्वाचं म्हणजे भारतीय कायदा याबद्दल नेमकं काय सांगतो हे सोपी गोष्टमध्ये समजून घेऊया...
संशोधन – ऋजुता लुकतुके
लेखन, निवेदन – ऋजुता लुकतुके
एडिटिंग – निलेश भोसले
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)