You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बिहार निवडणूक: तेजस्वी यादव यांच्या सभेला इतकी गर्दी का उसळत आहे?
राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख नेते आणि बिहार निवडणुकीतला युवा चेहरा म्हणून लालू प्रसाद यादवांच्या या मुलाकडे सध्या पाहिलं जातंय. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या विरोधातली आघाडी तेजस्वी यादव आणि त्यांचे भाऊ तेजप्रताप यादव लढवतायत.
महाआघाडीचा प्रचाराचा भार मात्र, तेजस्वी यादव यांच्यावरच पडल्यासारखं चित्र आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी तेजस्वी यादव यांच्यासोबत काही सभांना संबोधित केलं. मात्र, तेजस्वी यादव पायाला भिंगरी लावून राज्य पिंजून काढत आहेत.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.' रोज रात्री 8 वाजता बीबीसी मराठीचे कोरोना पॉडकास्ट तुम्ही फेसबुकवर पाहू शकता.)