You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मासिक पाळी : PCOD मुळे खरंच गर्भधारणा होऊ शकत नाही का?
अनेकांच्या मनात गैरसमज असतो की PCOD हा आजार असेल तर महिलांना गर्भधारणा होऊ शकत नाही. पण असं काहीही नाहीये.
तज्ज्ञ म्हणतात की, वेळीच आणि योग्य उपचार केले तर PCOD मुळे कोणतीही अडचण येत नाही. पण बऱ्याचदा अगदी तरुणपणी लग्न झालेल्या मुलींना यामुळे तणावाला सामोरं जावं लागतं.
अनेकदा घरचे लोक लग्नानंतर लगेचच मूल व्हावं म्हणून आग्रही असतात आणि या तणावामुळे PCOD असलेल्या मुलीचं गर्भारपण अधिकच लांबतं.
तज्ज्ञ सांगतात की अनेकदा फक्त एक काऊन्सेलिंग सेशन केलं आणि घरच्यांनी मुलीचा स्ट्रेस कसा कमी होईल याकडे लक्ष दिलं तर PCOD असणाऱ्या मुली कोणत्याही औषधोपचारांशिवाय गरोदर राहू शकतात. पण यासाठी डॉक्टरचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
पाहा हा व्हीडिओ.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)