कोरोना काळात तुमच्यावर ‘या’ उपकरणाची नजर
लॉकडाऊनचे निर्बंध अनेक ठिकाणी शिथिल केल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी लोकांची गर्दी वाढली आहे. शिवाय लोकांनी वर्क फ्रॉम होम सोडून कामाच्या ठिकाणी परत जायलाही सुरुवात केली आहे. पण, मास्क, शरीराची स्वच्छता आणि सोशल डिस्टन्सिंग हे नियम लोकांनी पाळणं आजही आवश्यक आहे.
हे नियम लोक पाळतात की नाही यावर नजर ठेवण्यासाठी बंगळुरूच्या एका स्टार्ट अप कंपनीने आर्टिफिशियल इंटलिजन्सवर आधारित एक उपकरण आणलं आहे – आयरिस. तुम्ही मास्क घातलंय की नाही, तसंच सोशल डिस्टन्सिंग पाळता की नाही आणि पाळत नसाल तर ते तुम्हाला इशाराही करतं.
सीसीटीव्ही फुटेज वापरून हे उपकरण काम करतं. त्याविषयीचा हा व्हीडिओ...
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)