आझरबैजान आणि आर्मेनिया संघर्ष संपवण्यात अमेरिकेला यश येईल?
Published
युद्धविरामानंतरही अझरबैजान आणि आर्मेनिया यांचं सैन्य एकमेकांवरचे हल्ले थांबवत नाहीयत.
दोन देशांमधला वाद आहे तो नागोर्नो-काराबाख या प्रांतावरून. या भागावर आर्मेनियन वंशाच्या लोकांचा ताबा आहे. पण, अधिकृतपणे हा भाग अझरबैजानच्या ताब्यात आहे.
दोन आठवड्यांच्या युद्धानंतर रशियाने दोन सैन्यादरम्यान युद्धविराम घडवून आणला. पण, दोघांनीही तो पाळला नाही आणि युद्धजन्य हल्ले अजून सुरूच आहेत. बीबीसीचा वादग्रस्त नागोर्नो-काराबाख भागातून रिपोर्ट...
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)