नासाचं अंतराळयान जेव्हा एका लघुग्रहाला 'टाळी' देऊन येतं

व्हीडिओ कॅप्शन, नासाचं अंतराळयान जेव्हा एका लघुग्रहाला 'टाळी' देऊन येतं
Published

पृथ्वीपासून 330 मिलियन किमी दूर बेन्नू नावाचा एक इवलासा लघुग्रह आहे. त्याची लांबी केवळ 550 मीटर आहे. नुकतंच त्याठिकाणी नासाचं ओसायरिस अंतराळयान केवळ 50 सेकंदासाठी उतरलं होतं.

जणू काही त्याने लघुग्रहाला टाळीच दिली होती. जसं ते उतरलं तेव्हा त्याने जमिनीवर नायट्रोजन गॅस सोडला आणि तिथली माती आणि दगड गोळा केले. त्यानंतर अंतराळायानाने परत उड्डाण केले. आता ते परत पृथ्वीकडे येतंय. पण त्यासाठी आणखी 3 वर्षं लागणार आहेत.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)