तुम्हाला कोरोना व्हायरसचा संसर्ग नेमका कुठे झाला हे सांगणारं जेनोम तंत्रज्ञान काय आहे?
कोरोना व्हायरस बद्दल युकेमध्ये सुरू असलेल्या एका संशोधनामुळे एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण नेमकी कुठे झाली हे शोधून काढता येणार आहे.
किंबहुना आताच या प्रणालीचा वापरही सुरू झाला आहे. नॉरफॉकमधल्या क्वाड्रम इन्स्टिट्यूट ऑफ बायोसायन्समध्ये सुरू असलेल्या संशोधनात दोन हजार पेक्षा जास्त कोरोना रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेऊन त्यांच्यातील कोरोना व्हायरसचा जेनेटिक कोड शोधून काढला जाईल.
आणि त्यातून कळू शकेल की रुग्णाला कोरोनाची लागण नेमकी कुठे झाली? हे जेनोम तंत्रज्ञान एखादी जागा किंवा ठिकाण कोरोनासाठी सुरक्षित आहे की नाही, हे सांगू शकेल आणि त्यातून कोरोनाचा उद्रेक आटोक्यात येईल असा शास्त्रज्ञांचा दावा आहे.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)