मासिक पाळीचं चक्र सुरळीत राहाण्यासाठी करा प्राणायाम आणि योगासने

व्हीडिओ कॅप्शन, मासिक पाळीचं चक्र सुरळीत राहावं करा प्राणायाम आणि योग
Published

महिलांची शारीरिक रचना, त्यांना होणारे आजार आणि त्रास पुरुषांपेक्षा वेगळे असतात. विशेषतः मासिक पाळी संदर्भात काही त्रास असतील तर त्यासाठी काही विशिष्ट प्रकारच्या योगासनांचा फायदा होऊ शकतो.

मासिक पाळीचं चक्र नियमित राहाण्यासाठी कोणत्याही प्रकारचा व्यायाम करणं अत्यंत आवश्यक आहे. डॉक्टर सांगतात की तुम्हाला धकाधकीच्या आयुष्यात वेळ मिळत नसेल तर रोज जिने चढणं किंवा एखादी वस्तू आणायला जायचं असेल तर गाडीचा वापर न करता पायी जाणं अशा लहानसहान उपायांनी व्यायाम होऊ शकतो.

पाळी नियमित करण्यासाठी प्राणायामचाही फायदा होतो.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)