BCG लस कोरोनापासून आपल्याला वाचवू शकेल का?

Published

कोरोनाच्या लशीवर जगभरात संशोधन सुरू आहे. पण, ती तयार होईपर्यंत कोव्हिड रुग्णांवर नेमके उपचार कसे करायचे? सध्या संसर्गजन्य रोगांवर वापरल्या जाणाऱ्या लशी कोव्हिड रुग्णांवरही परिणामकारक ठरू शकतील का, यावरही संशोधन सुरू झालं. आणि त्यातून हायड्रोक्सिक्लोरोक्वीन आणि रेमिडेसिवीर यासारखी काही औषधं मिळाली, तसंच अनेक देशांमध्ये एका लशीचा प्रयोगही कोरोनावर सुरू झाला. ती लस म्हणजे बीसीजी...किंवा शास्त्रीय नाव सांगायचं तर बॅसिल कॉलमेट गॉरिन.

क्षय रोगावर दिली जाणारी ही लस भारतातही लहान वयात दिली जाते. आता कोरोनावर तिचा किती परिणाम होतो यावरही जगभरात संशोधन सुरू झालंय. काही देशांमध्ये या लशीचा प्रयोग तसाही सुरूच आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)