मासिक पाळी : भारतीय स्त्रियांना मेनोपॉज लवकर येतो का?- पाहा व्हीडिओ
जगभरात महिलांचं मेनोपॉजचं सरासरी वय 49-51 असल्याचं मानलं जातं. पण भारतात महिलांचं मेनोपॉजचं वय 47-49 आहे. याचाच अर्थ भारतीय महिलांना जगातील महिलांच्या तुलनेत मेनोपॉज लवकर येतो.
डॉक्टरांच्या मते जसं सगळ्या महिलांसाठी गर्भावस्था एकसारखी नसते, तसंच मेनोपॉजची लक्षणं, त्यावेळेची शारीरिक-मानसिक अवस्थाही सगळ्या महिलांमध्ये एकसारखी नसते.
काही महिलांना मेनोपॉजच्या आधी नियमितपणे मासिक पाळी येत असते. काही महिलांमध्ये मासिक पाळीमधला रक्तस्त्रावहळूहळू कमी होतो आणि मग पाळी थांबते. काही महिलांमध्ये मासिक पाळीचं चक्र बदलत आणि पाळी महिन्याच्या महिन्याला न येता अनियमितता यायला लागते.
या कालावधीला 'पेरीमेनोपॉज' म्हणतात आणि याचा कालावधी काही महिने ते तीन-चार वर्षेही असू शकतो. जर एखाद्या महिलेला शेवटची पाळी आल्यानंतर 12 महिने पाळी आली नाही तर त्या महिलेचा मेनोपॉज सुरू झाला असं समजलं जातं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)