BBC Impact : थर्माकॉलच्या बोटींवरून प्रवास करणाऱ्या शिंदेवाडीच्या लोकांना मिळाले तराफे
Published
बीड जिल्ह्यातल्या पाटोदा तालुक्यातील सौताडा ग्रामपंचायतीमध्ये शिंदेवाडीचे गावकरी गेले दोन दशकं जीव धोक्यात घालून प्रवास करत होते. थर्माकॉलच्या तकलादू बोटी बनवून त्यावरून ते प्रवास करायचे.
बीबीसी न्यूज मराठीने या जीवघेण्या प्रवासाची बातमी दाखवल्यानंतर मुंबईच्या बांदेकरवाडी गणेशोत्सव मंडळाने गावाला सुरक्षित तराफे आणि साधनं उपलब्ध करून दिली आहेत. बीबीसी मराठीसाठी शाहिद शेख यांचा रिपोर्ट.
कॅमेरा - शाहिद शेख
व्हीडिओ एडिटर - निलेश भोसले
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)