महाराष्ट्र अनलॉक नियम : शाळा, सिनेमागृह 15 ऑक्टोबरला उघडणार का?
देशभरातल्या शाळा आणि थिएटर्स 15 ऑक्टोबर पासून उघडण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली आहे. काही राज्यांमध्ये शाळा याआधीच सर्व ती सोशल डिस्टन्सिंगची खबरदारी घेत सुरू करण्यात आल्या आहेत.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने शाळा सुरू करण्यापूर्वी मुलांच्या सुरक्षिततेसाठी काय करावं, काय नाही, याच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या असल्याचं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी सांगितलं.
दुसरीकडे केंद्रीय माहिती आणि सूचना प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी देशभरात सिनेमागृह सुरू करण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.
पण मॉल्स असो, रेस्टॉरंट्स असो वा आता सिनेमा हॉल, महाराष्ट्रातली परिस्थिती बघता ठाकरे सरकार केंद्र सरकारच्या सूचनांवरचे निर्णय उशिरानेच घेताना दिसलंय. त्यामुळे महाराष्ट्रात शाळा आणि सिनेमा हॉल 15 ऑक्टोबरला सुरू होतात का, हे पाहावा लागेल.
त्याबाबतचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी भेट द्या https://bbc.com.im/marathi
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)