कोरोना व्हायरस शोधणारी ही जलदगती चाचणी फक्त 15 मिनिटांत निकाल देणार
सगळे या क्षणी कोरोनाच्या लशीची वाट बघतायत हे खरं. पण, त्याचवेळी अगदी श्रीमंत देशांत सुद्धा कोरोनाच्या निदान चाचण्या पुरेशा प्रमाणात होत नाहीएत हे ही खरं. कोरोनाला आळा घालायचा असेल तर संसर्गाचं निदान होणं ही पहिली पायरी आहे. त्या दृष्टीने आता फक्त पंधरा ते 30 मिनिटांत निदान होऊ शकतील अशा रॅपिड चाचण्या बाजारात येणार आहेत.
या चाचणीची किंमतही फक्त पाच डॉलर म्हणजे अंदाजे 350 रुपये इतकी असेल. जागतिक आरोग्य संघटनेनं या चाचण्यांची किट् अल्प आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशात पोहोचवण्यासाठी पुढाकार घेतलाय. आणि अशा देशांसाठी यातल्या १२ कोटी चाचण्यांची किट्स राखीव ठेवण्यात येणारएत. आज सोपी गोष्टमध्ये जाणून घेऊया जागतिक आरोग्य संघटनेच्या या कार्यक्रमाविषयी...
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)