महाराष्ट्रात सामूहिक बलात्कार आणि बलात्कार करून खुनाची प्रकरणं देशात सर्वाधिक का?
2019मध्ये महाराष्ट्रात बलात्कार करून खून आणि सामूहिक बलात्काराच्या एकूण 47 घटना घडल्या आहेत. आणि या बाबतीत महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोचा हा अहवाल आहे.
‘भारतातील गुन्हेविषयक अहवाल, २०१९,’ असा हा अहवाल आहे आणि यात सगळ्या प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद आहे. पण, खून करून बलात्कार करण्याच्या बाबतीत महाराष्ट्र इतर राज्यांच्या खूप पुढे आहे. महाराष्ट्रा पाठोपाठ मध्य प्रदेश(३७), उत्तर प्रदेश(३४), आसाम(२६) आणि कर्नाटक(२३) यांचा क्रमांक लागतो.
देशभरात एकूण २७८ प्रकरणांची नोंद झाली आहे आणि यात सामूहिक बलात्कारांच्या घटनांचाही समावेश आहे. सोपी गोष्टमध्ये जाणून घेऊया या संवेदनशीलविषया मागची कारणं...
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)