You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमेरिकन अध्यक्षीय डिबेट 2020: डोनाल्ड ट्रंप आणि जो बायडेन यांच्यात खडाजंगी
भारतातला टीव्ही डिबेटसुद्धा इतका कधी तापला नसेल. इथं तर शब्दांचे बाँब फुटत होते. जगातल्या सगळ्यात श्रीमंत देशाच्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी उभे असलेले हे दोन नेते, डोनाल्ड ट्रंप आणि जो बायडेन, एकमेकांवर ओरडत होते,
एकमेकांना नावं ठेवत होते. आणि अगदी एकमेकांच्या घरच्यांचाही उद्धार करत होते. वेल! यालाच अमेरिकन प्रेसिडेन्शियल डिबेट असं म्हणतात. एकूण तीन अधिकृत डिबेट्स पैकी पहिला डिबेट किंवा वादसंवाद भारतीय वेळेनुसार आज पहाटे ओहायो राज्यातल्या क्लिव्हलँड शहरात पार पडला. आणि आज सोपी गोष्टमध्ये बघूया याच वादविवादातले मुद्दे आणि विश्लेषण...
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)