कोरोना व्हायरस : या देशात कोव्हिड योद्ध्यांनाच तुरुंगात टाकलं जातंय

Published

मार्चमध्ये कोरोनाने व्हेनेझुएलामध्ये प्रवेश केला. तेव्हापासून या देशात 200 आरोग्य कर्मचाऱ्यांना प्राण गमवावे लागले आहेत.

व्हेनेझुएलात जवळजवळ 30 हजार कोरोना रुग्ण आहेत. तर जवळजवळ 1 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे.

बीबीसीने इथल्या आरोग्य कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. त्यांची परिस्थिती जाणून घेतली. सरकारकडून अनेक दिवस मास्क आणि हँडग्लोव्ह्ज मिळालेच नाहीत, अशी त्यांची तक्रार आहे.

ड्यूटीवर असताच मृत्यू ओढवण्याची त्यांना भीती वाटते. या पेक्षाही भयंकर म्हणजे जर एखाद्या आरोग्य कर्मचाऱ्याने याविरोधात आवाज उठवला तर त्यांना तुरुंगात टाकलं जातयं किंवा बळजबरीने काम करायला भाग पाडलं जातंय. पाहा बीबीसी प्रतिनिधी व्लादिमीर हर्नांडेज यांचा हा रिपोर्ट.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)