एस. पी. बालसुब्रमण्यम यांचा निधनापूर्वीचा शेवटचा व्हीडिओ काय होता?
80-90च्या दशकात सलमान खान असो वा कमल हसन, यांच्या सिनेमांमधल्या गाण्यांना एस. पी. बालसुब्रमण्यम यांचाच आवाज असायचा. ‘मैंने प्यार किया’, ‘एक दूजे के लिए’, ‘हम आपके हैं कौन?’ सारख्या सिनेमांमधल्या अजरामर गाण्यांमुळे SPB यांचा आवाज आपल्या मनात कायमचा कोरला गेला.
दाक्षिणात्य सिनेमासह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अनोख्या आवाजामुळे मोठं नाव केलेले SP बालसुब्रहमण्यम यांचं शुक्रवारी दुपारी कोरोनामुळे निधन झालं.
बालसुब्रमण्यम 5 ऑगस्टपासून चेन्नईच्या एमजीएम हेल्थकेअर हॉस्पिटलमध्ये भरती होते. आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती सुब्रमण्यम यांनी स्वतःच एका व्हिडिओद्वारे त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून दिली होती.
पण गेल्या 24 तासांत त्यांच्या प्रकृती अधिक खालावली असून त्यांना जास्तीत जास्त लाईफ सपोर्ट देण्यात येत असल्याचं हॉस्पिटलने म्हटलं होतं. आणि अखेर शुक्रवारी दुपारी त्यांच्या निधनाची बातमी देण्यात आली.
SPB दाक्षिणात्य संगीतक्षेत्रात सम्राट मानले जायचे. 50 वर्षांहून अधिक काळ चाललेल्या त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी तामिळ, हिंदी, मलयाळम, कन्नड आणि तेलुगू भाषांमधील 40 हजारहून अधिक गाणी गायिली.
वाचा सविस्तर बातमी - https://bbc.com.im/marathi/india-54285452%3C/p%3E%3C/div%3E%3Cdiv dir="ltr" class="css-1k9op6x e17x9cvu0">
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)