You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राजीव सातव : कृषी विधेयक गदारोळानंतर संसद भवनाबाहेर विरोधकांनी रात्र काढली
राज्यसभेत कृषी विधेयक मांडताना विरोधी पक्षातल्या आठ खासदारांनी जोरदार गोंधळ घातला आणि राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांनी त्यांना निलंबित केलं. यात महाराष्ट्रातले राजीव सातव, तृणमूल काँग्रेसचे डेरिक ओ ब्रायन, डोला सेन, आपचे संजय सिंह आणि इतर खासदारांचा समावेश आहे.
या खासदारांना निलंबित केल्यानंतर त्यांनी संसदेच्या प्रांगणातल्या गांधी पुतळ्यासमोर निलंबनाविरोधात धरणं आंदोलन आणि उपोषण सुरू केलंय. निलंबन मागे घेत नाही तोवर या खासदारांनी हे आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय.
21 तारखेची संपूर्ण रात्र या खासदारांनी गवतावर झोपून काढली. यात महाराष्ट्रातले काँग्रेसचे खासदार राजीव सातव हे देखील आहेत.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)