You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
आपल्या हक्काच्या जमिनीसाठी कायदेशीर लढाई लढणाऱ्या सुनंदा मांदळे
पुण्यातल्या शिरूर तालुक्यात राहणाऱ्या सुनंदा मांदळे जेमतेम शाळा शिकल्या, पण आपल्या हक्काची जमीन मिळवण्यासाठी एकटी असूनही जिद्दीने कायदेशीर लढाई लढल्या.
पण ही लढाई लढणं त्यांच्यासाठी नक्कीच सोपं नव्हतं. कागदपत्रांची जमवाजमव करण्यातच त्यांना तीन वर्षं गेली.
सुनंदा यांना आपल्या वाटची काही जमीन मिळाली आहे तर काही भागाची केस अजून चालू आहे. याहीपुढे जात त्यांनी महिला राजसत्ता आंदोलन या संस्थेच्या मदतीने गावातल्या इतर महिलांसाठी कायद्याचं प्रशिक्षणं देणारी शिबिरं आयोजित केली.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)