‘या' जहाजावर एकही कर्मचारी नाही, मग ते चालतंय कसं?

व्हीडिओ कॅप्शन, ‘या' जहाजाचा कॅप्टन एक संगणक आहे आणि त्यावर एकही कर्मचारी नाही.
Published

मेफ्लॉवर ऑटोनॉमस शिप (MAS) हे पूर्ण ताकदीचं एक असं जहाज आहे, ज्यावर एकही कर्मचारी नाही. बोटीचा कप्तान आहे कृत्रिम बुद्धिमत्ता असलेला एक संगणक.

पूर्णपणे कर्मचारी विरहित अशा या जहाजाने अटलांटिक महासागरातून इंग्लंड ते अमेरिका प्रवास करण्याची ही पहिलीच वेळ आहे. सहा महिन्यांच्या या सफरीत हे जहाज तापमान वाढ आणि समुद्रातील प्रदूषण या संदर्भात माहिती आणि निरीक्षणं गोळा करणार आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)