You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना चीन : लॉकडाऊननंतर बीजिंगमध्ये आता सगळं 'नॉर्मल' सुरू झालंय का?
चीनमध्ये प्रशासनाने लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केल्यावर धीम्या गतीने व्यवहार सुरू होतायत.
बिजिंगच्या रस्त्यांवर आणि चौकात पूर्वीसारखी गर्दी पाहायला मिळतेय. जूनमध्ये बिजिंगमध्ये होलसेल मार्केट संबंधित कोव्हिड रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्याचं लक्षात आलं होतं.
त्यानंतर यंत्रणांनी ताबडतोब रुग्णांच्या संपर्कातील लोकांना क्वारंटाईन केलं, जवळपासचा परिसर लॉकडाऊन केला आणि मोठ्या प्रमाणात तिथल्या रहिवाशांची तपासणी केली.
अशा पद्धतीने यंत्रणांनी तातडीचे उपाय केल्याने परिस्थिती आटोक्यातही आली. पण कोरोनाच्या उद्रेकाची शक्यता असल्याने जोपर्यंत लस उपलब्ध होत नाही तोपर्यंत वारंवार लॉकडाऊन करण्याला पर्याय नसल्याचं दिसतंय. बीबीसीचे प्रतिनिधी स्टीफन मॅकडोनेल यांचा बिजिंगमधून रिपोर्ट.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)