शुक्र ग्रहावरही असू शकते दुसरी जीवसृष्टी, युकेतील शास्त्रज्ञांचा दावा

व्हीडिओ कॅप्शन, पृथ्वीच्या जवळचा ग्रह शुक्रावरही असू शकते दुसरी जीवसृष्टी. युकेतील शास्त्रज्ञांचा दावा
Published

शुक्र ग्रहावरही जीवसृष्टी असू शकते असा सबळ पुरावा काही खगोल शास्त्रज्ञांच्या हाती लागला आहे.

खगोलशास्त्रज्ञांच्या एका आंतरराष्ट्रीय समुहाने असा दावा केला आहे की, शुक्राच्या वातावरणात एक प्रकारचा वायू असल्याचं त्यांच्या संशोधनात दिसलं. हा वायू सूक्ष्म जीवजंतूंनीच वातावरणात सोडला असणार असं या शास्त्रज्ञांचं गृहितक आहे. अर्थात, वायूच्या उगमाचं आणखी एखादं कारण असू शकतं हे ते नाकारत नाहीत. पण, असं दुसरं ठोस कारणही संशोधनातून मिळालेलं नाही.

त्यामुळे सध्या जगभरातील खगोल शास्त्रज्ञांच्या वर्तुळात शुक्र ग्रहावरील संभाव्य जीवसृष्टी हा चर्चेचा आणि कुतुहलाचा विषय ठरलीय. बीबीसीचे विज्ञानविषयक प्रतिनिधी पल्लभ घोष यांचा रिपोर्ट...

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)