हिंदी दिन : भारताची राष्ट्रभाषा ही खरंच हिंदी आहे का?

व्हीडिओ कॅप्शन, हिंदी दिवस : भारताची राष्ट्रभाषा ही खरंच हिंदी आहे का?
Published

14 सप्टेंबर हा हिंदी दिन म्हणून साजरा केला जातो. हिंदी ही राष्ट्रभाषा आहे की नाही, हे नेहमीच वादाचा मुद्दा राहिला आहे.

गेल्या वर्षी नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये मांडलेल्या हिंदी भाषक नसलेल्या राज्यांत हिंदी शिकविण्याच्या प्रस्तावाला दक्षिणेकडील राज्यांमधून विशेषतः तामिळनाडूमधून प्रचंड विरोध झाल्यानंतर सरकारने या धोरणाच्या मसुद्यात बदल केला होता.

पण मुळात हिंदी भाषक नसलेल्या राज्यांमध्ये हिंदी शिकवण्यावरून एवढा गदारोळ का होतो? हिंदीला विरोध होण्यामागची कारणं नेमकी काय आहेत? हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे की नाही? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.

अँकर- नीलेश धोत्रे

प्रोड्युसर-अमृता कदम

शुट आणि एडिट – आशिष कुमार

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)