आपल्या जेवणाच्या ताटातली विविधता कुठे हरवली?- पाहा व्हीडिओ

व्हीडिओ कॅप्शन, आपल्या जेवणाच्या ताटातली विविधता कुठे हरवली?- पाहा व्हीडिओ
Published

कधी काळी आपल्या आहाराचा महत्त्वाच्या रानभाज्या दोन दशकांपासून आपल्या जेवणाच्या ताटातून गायब झाल्या. नीलिमा जोरवर अनेक वर्षं रानभाज्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करत आहेत.

त्यांनी या विषयावर 'बखर रानभाज्यांची' हे पुस्तकही लिहिलं आहे.ह्याद्रीच्या कुशीतल्या अकोले तालुक्यात राहताना नीलिमा रानभाज्यांच्या प्रेमात पडल्या.त्यासाठी रानंवनं फिरल्या आणि सापडलेल्या भाज्या शिजवून खाऊनही पाहिल्या.

या भाज्या नसल्यामुळे आपला आहार एकसुरी झाल्याचं त्या म्हणतात. पण रानभाज्यांचं संवर्धन न करता निसर्ग ओरबाडण्याचा त्या ठामपणे विरोध करतात.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)