You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना चाचणीच्या दरात कपात करण्याचा सरकारचा निर्णय
महाराष्ट्रात कोरोना चाचण्यांच्या दरांमध्ये कमालीची घट करण्याचा निर्णय झाला आहे. कोरोनामुळे नकारात्मकता पसरलेल्या जगात ही काहीशी दिलासादायक बातमीच म्हणावी लागेल. कोरोनाबाधेमुळे अनेकांना आर्थिक नुकसान होतंच आहे आणि चाचणीही काहीशी महाग होती.
त्यामुळे राज्य सरकारने कोरोना चाचण्यांच्या दरांमध्ये तब्बल 600 ते 800 रुपयांची कपात केली असून आज 8 सप्टेंबरपासून हा निर्णय लागू होतोय. त्यामुळे कोरोनाची चाचणी अवघ्या 1200 रुपयात होणार आहे.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)